menu
menu
menu
 logo img
कंपन्याएसबीआयसह टायटन कंपनीने भारताची पहिली कॉन्टॅक्टलेस पेमेंट घड्याळे लॉंच केली

एसबीआयसह टायटन कंपनीने भारताची पहिली कॉन्टॅक्टलेस पेमेंट घड्याळे लॉंच केली
टायटन कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. के. वेंकटरमण आणि एसबीआय चे अध्यक्ष श्री. रजनीश कुमार

बंगलुरू, भारत

वाढत्या करोना वायरस चा प्रादुर्भाव लक्षात घेता, सर्व सामान्यांसाठि सुरक्षित खरेदी उपाय आणण्याची तातडीची गरज भासत आहे. जगातील पाचवा क्रमांक असलेला घडाळ्यांचा ब्रँड टायटन कंपनी लिमिटेडने एसबीआयद्वारे समर्थित योनो टायटन पे सादर करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) सह भागीदारी केली आहे.

या भागीदारीच्या माध्यमातून टायटन आणि एसबीआय प्रथमच कॉन्टॅक्टलेस (संपर्करहित) पेमेंट फंक्शनॅलिटीसह अनेक स्टाईलिश नवीन घड्याळे भारतात सादर करीत आहेत. या लॉन्चमुळे एसबीआय खातेदार एसबीआय बँकचे डेबिट अथवा क्रेडिट कार्ड स्वाइप केल्याशिवाय कॉन्टॅक्टलेस पेमेंट पीओएस मशीनवर त्यांचे टायटन पे वॉच टॅप करू शकतात. पिन टाकल्याशिवाय फक्त २००० रुपये पर्यंतची देयके दिली जाऊ शकतात. टॅपी टेक्नॉलॉजीजद्वारे वॉच स्ट्रॅपमध्ये एम्बेड केलेली एक सुरक्षित आणि प्रमाणित नियर-फील्ड कम्युनिकेशन (एनएफसी) चिप कॉन्टॅक्टलेस एसबीआय डेबिट कार्डची सर्व कार्यक्षमता सक्षम करते.या घड्याळांवरील देयक (पेमेंट) प्रणाली देशातील दशलक्षाहूनही अधिक संपर्कविरहित मास्टरकार्ड-सक्षम पॉईंट-ऑफ-सेल (पीओएस) मशीनवर वापरण्यायोग्य असेल. मोहक घड्याळांच्या या संग्रहात पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी शैलींचा समावेश आहे आणि सर्व एसबीआय आणि टायटन ग्राहकांसाठी ही घड्याळे रु.२९९५ आणि रु.५९९५ दरम्यान आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत.

यावेळी बोलताना टायटन कंपनी लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक श्री. के. वेंकटरामन म्हणाले, “टायटन हे नेहमीच डिझाईन आणि नाविन्य याबाबतीत अग्रेसर होते. आम्ही आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा भागविण्यासाठी नेहमीच नवनवीन उत्पादने सुरू केली आहेत. वेगवान, सुरक्षित अशा बदलत्या काळानुसार  पेमेंट सोल्यूशन सादर करण्यासाठी एसबीआय परिपूर्ण भागीदार आहे. हे उत्पादन केवळ ग्राहकांच्या बँकिंगच्या गरजाच भागवणार नसून, आजच्या विकसनशील ग्राहकांना त्याच्या क्लासिक व अत्याधुनिक डिझाईन्ससह देखील देईल.

या भागीदारी बद्दल आपले विचार व्यक्त करताना एसबीआयचे अध्यक्ष श्री. रजनीश कुमार म्हणाले, “टायटनच्या कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स प्रकल्पामध्ये या अनोख्या प्रस्तावाच्या प्रक्षेपणात सहभागी झाल्याचा आम्हाला आनंद झाला. टायटन पेमेंट वॉच्स असलेल्या आमच्या योनो ग्राहकांसाठी स्मार्ट आणि नाविन्यपूर्ण शॉपिंग सोल्यूशन प्रदान करण्यासाठी, जगातील व्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या घड्याळ उत्पादकाशी हातमिळवणी केल्यामुळे मला खूप आनंद होतो. आम्हाला विश्वास आहे की ही अभिनव ऑफर आमच्या ग्राहकांसाठी टॅप अँड पे तंत्रज्ञानासह खरेदीच्या अनुभवाची एक नवीन दिशा दाखवेल. नवीनतम तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे स्टेट बँक ऑफ इंडिया नेहमीच आमच्या ग्राहकांना नाविन्यपूर्ण, सर्वोत्कृष्ट दर्जाची बँकिंग सेवा देण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे.

टायटन कंपनी नेहमीच नवनिर्मितीच्या केंद्रस्थानी राहिली आहे आणि वापरकर्त्यांच्या सोयीसाठी आणि सहजतेसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यावर विश्वास ठेवते. ही घड्याळे पेमेंटमधील अडथळे दूर करतात आणि ग्राहकांना जलद, संपर्कविरहित, सुरक्षित आणि सुलभ व्यवहार करण्याच्या गरजा भागवतात. तंत्रज्ञान आणि डिझाइनमध्ये सातत्याने गुंतवणूकीद्वारे टायटनचा हेतू आहे की ग्राहकांसाठी स्मार्ट सेगमेंटमधील उत्पादने आणि नवनवीन ऑफर नियमित सुरू ठेवाव्यात.

हा संग्रह केवळ www.titan.co.in वर उपलब्ध आहे.

 logo img
अधिक बातम्या
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापुरच्या सराफाने नवरा- नवरीसाठी
18 May 2020 | 8:16 AM

 समीर मुजावर, कोल्हापूर :गेल्या दीड महिन्यापासून काम नाही,दुकान बंद करून घरी बसलेल्या एका सराफाने समाज प्रबोधन करण्यासाठी चक्क चांदीचा मास्क बनवला.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापुरच्या सराफाने नवरा- नवरीसाठी
18 May 2020 | 8:13 AM

 समीर मुजावर, कोल्हापूर :गेल्या दीड महिन्यापासून काम नाही,दुकान बंद करून घरी बसलेल्या एका सराफाने समाज प्रबोधन करण्यासाठी चक्क चांदीचा मास्क बनवला.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापुरच्या सराफाने नवरा- नवरीसाठी
16 May 2020 | 2:32 PM

 समीर मुजावर, कोल्हापूर :गेल्या दीड महिन्यापासून काम नाही,दुकान बंद करून घरी बसलेल्या एका सराफाने समाज प्रबोधन करण्यासाठी चक्क चांदीचा मास्क बनवला.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापुरच्या सराफाने नवरा- नवरीसाठी
16 May 2020 | 2:30 PM